हजारो कोटी बुडवून पळालेल्या मल्याचे सरकारने काय केले ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार यांनी ७१ हजार कोटींचे शेतक ऱ्यांचे कर्ज माफ केले, आता तशीच वेळ पुन्हा आल्याचे सांगत कांदा, टॉमेटो रस्त्यावर फेकून द्यावे लागतात, अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतक ऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगवीत केले. नऊ हजार कोटी बुडवून विजय मल्या निघून गेला, त्याचे सरकारने काय केले, अशी विचारणा करतानाच पुणे, िपपरीतील नागरिकांना जर स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार असेल तर दौंड, बारामती, इंदापूरच्या नागरिकांनी दूषित पाणी का म्हणून प्यायचे, असा मुद्दाही अजितदादांनी उपस्थित केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar commented on contaminated water
First published on: 16-05-2016 at 02:17 IST