पत्नीकडे सर्वाधिक मालमत्ता
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बारामती विधानसभा निवडणुकीतील उमेदवार अजित पवार आणि त्यांच्या पत्नीकडे स्थावर आणि जंगम मिळून एकूण ७४ कोटी ४२ लाखांची संपत्ती आहे. अजित पवार यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या नावे अधिक मालमत्ता असल्याचे त्यांनी दिलेल्या विवरण पत्रातून स्पष्ट झाले.
अजित पवार यांच्या नावे होंडा एकोर्ड, होंडा सीआरव्ही, टोयोटो कॅम्ब्रे या तीन मोटारी आणि दोन ट्रॅक्टर, चार ट्रेलर आहेत. त्यांची किंमत सुमारे ८९ लाख आहे. पत्नीच्या नावेही इनोवा क्रिस्टा ही मोटार आणि एक ट्रॅक्टर आहे. पवारांकडे १३ लाख ९० हजारांचे, तर पत्नीकडे ६१ लाख ५६ हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने आहेत. पवार दाम्पत्याच्या नावे सोनगाव, काटेवाडी, ढेकळवाडी येथे शेतजमीन, तर इंदापूर, लोणीकंद, जळोची, काटेवाडी येथे बिगरशेत जमीन आणि बांधकामे आहेत. त्यांची एकूण किंमत ५० कोटींहून अधिक आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील नियमबा कर्जवाटप प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यचा उल्लेखही आजित पवार यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.
* अजित पवार यांच्याकडील मालमत्ता
२७ कोटी २५ लाख ५६ हजार
’* पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडील मालमत्ता
४७ कोटी १६ लाख ४७ हजार
* वित्तीय कर्ज
* पवार- १ कोटी ५ लाख ५५ हजार
* पत्नी- २ कोटी ६८ लाख १४ हजार
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
२४ कोटींची संपत्ती
* बँक ठेवी : ४६ लाख २० हजार ७८७
* शेअर्स : एक लाख ६२ हजार २०
* कर्ज : ३८ लाख २४ हजार ४२६
* वाहन : ट्रॅक्टर
* दागिने : २१ लाख सहा हजार
* एकूण मालमत्ता : १० कोटी ३८ लाख ९४ हजार ६३९
पत्नी मीना भुजबळ यांच्या संपत्तीचे विवरण
* बँक ठेवी : १६ लाख ४१ हजार १७९
* शेअर्स : २५ लाख २५ हजार १००
* विमा : १६ लाख १० हजार ८९५
* कर्ज : १६ लाख ३५ हजार २९५
* वाहन : टाटा पीकअप
* दागिने : २० लाख चार हजार
* एकूण मालमत्ता : १३ कोटी ८८ लाख ९८ हजार ६७४
गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे (भाजप)
* एकूण संपत्ती—२४ कोटी ७८ लाख
* जंगम संपत्ती—९ कोटी ४५ लाख
* स्थावर संपत्ती— १५ कोटी ३२ लाख
विखे यांच्या संपत्तीचे विवरण
* जंगम मालमत्ता—४ कोटी ६९ लाख ७८ हजार ६७२ रुपये
* स्थावर मालमत्ता—५१ लाख १३ हजार २०० रुपये
* रोख रक्कम—१ लाख ५९ हजार ७८९ रुपये
* बँक ठेवी—२ कोटी ३७ लाख
* मुदत ठेवी—२७ हजार ८५६ रुपये
* शेअर्स — १ कोटी ७४ लाख ९० हजार ९९५ रुपये
* दागिने— ५५० ग्रॅम सोने (किंमत २० लाख १३ हजार रुपये)
* शेतजमीन—१९ एकर २७ गुंठे (किंमत १ कोटी ७ लाख ४३ हजार रुपये)
* कर्ज—नाही
* वाहन—नाही
पमी—शालिनी विखे यांच्या संपत्तीचे विवरण
*जंगम मालमत्ता—४ कोटी ७५ लाख ६२ हजार ९८९ रुपये
* स्थावर मालमत्ता—३९ लाख ३६ हजार रुपये
* रोख रक्कम—६७ हजार ९१ रुपये
* बँक ठेवी—२ कोटी ४२ लाख
* मुदत ठेवी—७९ हजार १६० रुपये
* शेअर्स — १ कोटी १० लाख ५२ हजार ३१ रुपये.
* दागिने—११५० ग्रॅम (किंमत ४२ लाख ५७ हजार ४०० रुपये)
* शेतजमीन—१९ एकर २ गुंठे (किंमत ४२ लाख ५७ हजार ४०० रुपये)
* कर्ज—नाही
* वाहन—नाही
एकनाथ शिंदे यांची मालमत्ता ५ कोटी ९ लाख
ठाणे : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आणि कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार एकनाथ शिंदे यांची स्थावर आणि जंगम मिळून एकूण ५ कोटी ०९ लाख ९५ हजार ७७७ रुपये एवढी मालमत्ता आहे. तर त्यांची पत्नीच्या नावे स्थावर आणि जंगम मिळून एकूण ५ कोटी ९६ लाख ७ हजार ७४६ रुपये एवढी मालमत्ता आहे.
स्थावर मालमत्ता : ’ एकनाथ शिंदे यांच्या नावे- ४ कोटी ४७ लाख ५० हजार
* पत्नीच्या नावे- ४ कोटी ९८ लाख
जंगम मालमत्ता : ’ एकनाथ शिंदे यांच्या नावे- ६२ लाख ४५ हजार ७७०
* पत्नीच्या नावे-९८ लाख ०७ हजार ७४६
कर्ज : * एकनाथ शिंदे यांच्या नावे- ३ कोटी २० लाख ६४ हजार १९५ रुपये
* पत्नीच्या नावे- ५३ लाख ९६ हजार ६६ रुपये
वाहने : * एकनाथ शिंदे यांच्या नावे- एक आरमाडा, एक स्कॉर्पिओ आणि एक बोलरो (एकूण किंमत- ४ लाख १९ हजार ४७०)
* पत्नीच्या नावे– एक टेम्पो, दोन इनोव्हा आणि एक स्कॉर्पिओ (एकूण किंमत- ४२ लाख ३६ हजार)
दागिने : * एकनाथ शिंदे यांच्या नावे- ४ लाख १२ हजार ५०० रुपये (११० ग्रॅम)
* पत्नीच्या नावे- २१ लाख ७५ हजार (५८० ग्रॅम)
शस्त्रे : ’ एकनाथ शिंदे
यांच्या नावे- एक रिव्हॉल्वर, एक पिस्तूल
(एकूण किंमत- ४ लाख ७५ हजार)