अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांची संदिग्ध भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे.  भोसरीमध्ये पार पडलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठावर विलास लांडे यांच्या पत्नी उपस्थित होत्या. त्याचबरोबर विलास लांडे यांचा फोटो देखील डिजिटल स्क्रिनवर झळकल्याच पाहायला मिळालं. जुन्नरमधून शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने भोसरीमध्ये रात्री शिवस्वराज्य यात्रा दाखल झाली. दरम्यान, आज सकाळपासूनच शहरातील भोसरीमध्ये या शिवस्वराज्य यात्रेची जयंत तयारी सुरू होती.

हेही वाचा >>> लाडक्या खुर्चीसाठी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीची आठवण- अमोल कोल्हे

अजित पवार गटाचे आमदार विलास लांडे यांनी मंडपात येऊन आढावा घेतल्याने एकच चर्चा रंगली होती. संध्याकाळी झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या मेळाव्यात विलास लांडे यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या. तसेच शरद पवार गटाच्या व्यासपीठाच्या मागे असलेल्या डिजिटल स्क्रिनवर देखील विलास लांडे यांचा फोटो असल्याने चर्चेला उधाण आल आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित गव्हाणे मी तुमच्या सोबत…

गव्हाणे हे महाविकास आघाडीकडून भोसरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. यावरून जयंत पाटील यांनी एक टिपण्णी केली. अजित गव्हाणे तुमच्याकडे कोण बघणार? कुणी अस म्हणत असेल तर हा जयंत पाटील तुमच्या सोबत आहे. तुम्ही काही काळजी करू नका. तुमची नेहमी भेट घेत राहील.