सोमवारी पुणे महानगरपालिकेची मुदत संपली. दरम्यान यापूर्वी नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांच्या उद्घटानांची लगबग रविवारपासूनच शहरामध्ये सुरु आहे. रविवारी तर पुण्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ३१ वेगवगेळ्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. रविवारी नियोजित कार्यक्रमांपैकी शेवटच्या कार्यक्रमासाठी सातच्या आसपास अजित पवार खराडी येथील ऑक्सिजन पार्कच्या भूमिपूजनासाठी पोहचले. यावेळी तेथे राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार सुनील टिंगरे हे नेतेही उपस्थित होते. अजित पवार भाषण करु लागताच जवळच्या मशिदीमधून अजान सुरु झाली. त्यानंतर अजित पवारांनी केलेली कृती सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरतेय.

अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये विकासकामांची माहिती देताना कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. सायंकाळी सात सव्वा सातच्या सुमारास हे भाषण सुरु असतानाच शेजारीच असणाऱ्या मशीदीमधून अजानचा सुरु झाल्याचा आवाज ऐकू आला. हा आवाज येताच अजित पवारांनी आपलं भाषण थांबवलं. अजित पवार अजान संपेपर्यंत काही मिनिटं भाषण न करताच उभे राहिले. अजित पवारांच्या या कृतीची कार्यकर्त्यांमध्ये

एवढा मोठा हार नको…
अजान संपल्यानंतर अजित पवारांनी भाषण पुढे सुरु करत विकासकामांचा पाढा वाचून दाखवला. यावेळी अजित पवारांच्या भाषणाआधी त्यांना घालण्यात आलेल्या मोठ्या आकाराच्या हारावरुनही त्यांनी कार्यकर्त्यांना फटकारलं. “एवढा मोठा हार मी कधी घातला नाही. एवढा मोठा हार नको. वायफळ खर्च नको. जिथं उपयोग होईल तिथं खर्च करा,” असं अजित पवार आपल्या समर्थकांना म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रभाग रचेनबद्दलही दिली माहिती…
अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये प्रभाग रचेनेच्या विषयावर स्पष्टीकरण देताना प्रभाग रचना दोन सदस्यीय होणार असल्याच्या चर्चांना काही अर्थ नाहीय. प्रभाग रचना तीन सदस्यांची राहणार आहे. निवडणुकीला नक्की किती दिवस बाकीयत हे आताच सांगता येणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.