पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला राष्ट्रवाद काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर अजित पवार यांच्या बारामतीमध्ये समर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. पक्षांतर्गत लोकशाहीचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया बारामती शहराध्यक्ष जय पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला. त्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्ष कार्यालयात दाखल झाले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे जल्लोष करत स्वागत करण्यात आले. फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. अजित पवार राज्याला पुढे घेऊन जातील, असा दावा जय पाटील यांनी केला.
हेही वाचा >>>पुणे : कोयना धरणात सुरू होणार वॉटर स्पोर्टस
अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बारामती दौरा केला होता. या दौऱ्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. बारामती लोकसभा आणि विधानसभेसाठी त्यांनी दिलेल्या उमेदवारालाच विजयी करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले होते.