राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावना लाही दिवसापूर्वी चौफुला येथील एका कला केंद्राच्या परिसरामध्ये गोळीबार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शंकर मांडेकर यांच्या भावाला पोलिसांनी अटकदेखील केली होती. त्यानंतर अजित पवार हे आमदारांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष होते.

त्या सर्व घडामोडीदरम्यान आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम झाला, त्यावेळी व्यासपीठावर आमदार शंकर मांडेकर हे देखील उपस्थित होते.त्यावेळी अजित पवार म्हणाले, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकारी झालेला आहात, त्यामुळे तुमच्याकडून कधीच कोणतीही चूक होऊ देऊ नका, कुठे चौफुल्यावर जाऊन तडफडू नका, कुठे जाऊन ढगात ठौंय ठौंय गोळ्य मारू नका, त्यामध्ये त्याची आणि पक्षाची बदनामी होईल. आमचा काय दोष आहे. आम्ही सांगतो का, गोळ्या घाला म्हणून हे चालणार नाही. अशा शब्दात आमदार शंकर मांडेकर यांच्यासमोरच अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाबाबत अजित पवार बोलताना म्हणाले की, काही जणांनी कशाप्रकारे आपल्या सुनांना त्रास दिला? आम्ही सांगितलं का? तुम्ही लग्नाला बोलावलं आणि आम्ही गेलो. उद्या सरपंचाने आम्हाला लग्नाला बोलावलं तर आम्ही जाणार, पण पुढे जाऊन काय दिवा लागणार आहे, ते जर माहिती असतं तर नाही जाणार, एक माणुसकी लक्षात ठेवा ना बाबांनो, जातीचा पातीचा, नात्याचा गोत्याचा विचार न करता, जातीय सलोखा ठेवा, ही शिव शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा असल्याचे त्यांनी सांगितले.