“अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र एकाच व्यासपीठावर आलो आहोत. अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला”, असे विधान अमित शाह यांनी काल (६ ऑगस्ट) पुण्यात केले. यावरून संजय राऊतांनी आज टीकास्र सोडलं होतं. संजय राऊतांच्या या टीकेवर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“अमित शाहांनी कौतुक केल्यानंतर तुम्हाला का वाईट वाटतंय?” असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी आज विचारला. “आम्ही वडिलधाऱ्यांचा आदर करणारी माणसे आहोत. राज्याच्या विकास करण्याकरता, परिसराचा कायापालट करण्याकरता, आपल्या अनेक समस्या सोडवण्याकरता, लोकप्रतिनिधीची कामं होण्याकरता मी हा निर्णय घेतला आहे. आज देशपातळीवर मला तरी नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय दिसत नाही”, असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> “२०२४ नंतरही अजितदादा…”, अमित शाहांच्या कौतुकावर संजय राऊतांची टीका; म्हणाले, “सिंचन घोटाळ्याचा नेता”

“काहीजण माझ्यावर टीका करतात की मी आधी असं बोलत होतो, आता तसं बोलतोय. पण अनुभवातून माणसाची मतं उमटत असतात. परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० रेल्वे स्टेशन २५ हजार कोटींची तरतूद केली. पहिल्या टप्प्यात १२६ स्टेशनसाठी १३ हजार कोटींची तरतूद केली. यापैकी ४४ स्थानक महाराष्ट्रातील आहेत. प्रत्येकाला ४० कोटी दिले आहेत. ४० कोटी रक्कम कमी नाही”, अशी माहितीही पवारांनी दिली.

हेही वाचा >> “अजित पवार यांची जागा…”, केंद्रीय अमित शाह यांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर मोठे वक्तव्य; म्हणाले, “पण उशीर केला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित शाह काय म्हणाले होते?

केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह काल (६ जुलै) पुणे जिल्ह्यात केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (CRCS) कार्यालय या पोर्टलचे अनावरण करण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला. “अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र एकाच व्यासपीठावर आलो आहोत. अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला”, असे विधान अमित शाह यांनी केले.