scorecardresearch

Akshaya Tritiya 2022: ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

हे आंबे उद्या ससूनमधील रुग्ण,अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत.

dagdusheth ganpati
सालाबादप्रमाणे यंदाही आकर्षक सजावट करण्यात आलीय.

अक्षय्य तृतीय सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही हा आंब्याचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला आहे.

ही आंब्याची आरास पाहण्यास भाविकांनी एकच गर्दी केली आहे. तसेच हे आंबे उद्या ससूनमधील रुग्ण,अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत.

अक्षय्य तृतीय सण आणि आंबा महोत्सवानिमित्त आज मंदिरामध्ये पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत गणेश याग, दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांनाना भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

तर रात्री नऊ वाजता अखिल भारतीय महिला मंडळाच्या वतीने भजन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshaya tritiya 2022 dagdusheth ganpati 11000 mango decoration svk 88 scsg