पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात त्याला सहकार्य करणारे ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करून अटक करण्याची परवानगी पोलिसांकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मागण्यात आली आहे. पण, भाजपच्या एका मंत्र्याच्या दबावामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या फाईलवर नकारार्थी शेरा मारला आहे, असे सांगून आमदार रवींद्र धंगेकर यांनी डॉ. संजीव ठाकूर यांना सरकार पाठीशी घालत आहे, असा आरोप सोमवारी केला केला. संजीव ठाकूर यांची बदली सरकारने नाही तर मॅटने केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

राज्यातील गुंड आणि अवैध धंदे सांभाळणाऱ्या या मंत्र्याची देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी धंगेकर यांनो केली. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घालावे, अशीही मागणी त्यांनी केली. पोलिसांना ठाकूर दोषी वाटत असतील तर त्यांची चौकशी रोखण्याचा अधिकार मंत्र्यांना कोणी दिला असा सवाल करून सरकार लपवाछपवी करत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला.

हेही वाचा : ललित पाटीलचा ससूनमधील मुक्काम कसा वाढला? तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर यांच्या जबाबातून माहिती उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इडी चौकशीच्या भीतीपोटी भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेले मंत्री आपल्या पदाला जय न्याय देणार, असा सवाल धंगेकर यांनी उपस्थित केला. या प्रकरणात हस्तक्षेप करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी डॉ. संजीव ठाकूर यांना अटक करण्याची परवानगी पोलिसांना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.