पुणे : मुस्लीम महिलांना मशिदीत जाऊन नमाज पठण करता यावे, यासाठी पुण्यातील एका दाम्पत्याने गेल्या वर्षी रमजान महिन्यात लढा सुरू करून त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या लढय़ाची दखल घेत मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाला मशिदींमध्ये महिलांना नमाज पठणाचा अधिकार असल्याचे मान्य करावे लागले. यामुळे गेल्या वर्षीच्या रमजान महिन्यात जिथे महिलांना मज्जाव होता त्याच मशिदीत यंदा मुस्लीम महिला नमाज पठण करताना दिसत आहेत. याच धर्तीवर देशभरातील सगळय़ा महिलांना मशिदीत जाऊन नमाज पठण करू द्यावे, अशी मागणी एका दाम्पत्याने केली आहे.

हेही वाचा >>> मुस्लीम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सदोष, सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण : कर्नाटक सरकारकडून अंमलबजावणी स्थगित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी रमजानच्या खरेदीसाठी शेख दाम्पत्य लष्कर भागामध्ये गेले होते. मात्र, नमाज अदा करण्याची वेळ जवळ आल्यावर  अन्वर शेख यांना मशिदीत प्रवेश देण्यात आला. फरहान यांना बाहेर पावसात भिजत उभे राहावे लागले. त्यानंतर या जोडप्याने ते वास्तव्यास असलेल्या बोपोडी येथील मशिदीच्या व्यवस्थापनाकडे महिलांना मशिदीत प्रवेश देण्याची मागणी केली. मात्र, त्याला नकार देण्यात आल्याने  दाम्पत्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेसंदर्भात मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाला मुस्लीम महिलांना मशिदीत जाऊन नमाज पठण करण्याचा अधिकार असल्याचे मान्य केले होते.