पुणे : कात्रजमधील आंबेगाव परिसरात एका महिलेने सहा वर्षांच्या मुलासह इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. महिलेेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नणंदेच्या छळामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१), विष्णू शशिकांत देशमुख (वय ६) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मायलेकांची नावे आहेत.

आत्महत्या प्रकऱणाची नोंद आंबेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी एका खासगी शाळेत बालवाडीत शिक्षिक होत्या. त्यांचे पती शशिकांत हे एका बँकेत नोकरी करतात. देशमुख कुटुंबीय मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहे. विष्णू त्यांचा एकुलता एक मुलगा होता. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मयुरीने पाचव्या मजल्यावरुन सहा वर्षांचा मुलगा विष्णू याच्यासह उडी मारली. त्या वेळी मयुरीचे पती घरात नव्हते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आवाज झाल्यानंतर सोसायटीतील नागरिक बाहेर आले. तेव्हा मयुरी आणि त्यांचा मुलगा विष्णू हे सोसायटीतील आवाारात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोालीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने घटनास्थळी आले. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा मयुरीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. नणंदेच्या त्रासामुळे आत्महत्याचा निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत नमूद केले.