पुण्यातील हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरवरील मैदानात अमरावती मध्यवर्ती कारागृहातील जेलरच्या मुलाचा एका तरुणी आणि चार पुरुषांनी कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गिरीधर गायकवाड (२१) असे मयत तरुणीचा नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल कुमार गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार गिरीधर गायकवाड या मयत तरुणाच्या मोबाईलवर मंगळावारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फोन आला. त्यावेळी घरातून बाहेर पडताना, कोणाचा फोन आहे,कुठे चाललास असे त्याच्या भावाने विचारले. त्यावर जाऊन येतो म्हणून उत्तर दिले आणि तो निघून गेला. गिरीधर बराच वेळ झाला तरी घरी आला नाही. म्हणून निखिल कुमार याने फोन लावला. तेव्हा एकदा रिंग वाजली आणि काही वेळाने फोन नॉट रिचेबल लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर अगदी काही मिनिटांनी वडिलांचा आम्हाला फोन आला. ग्लायडिंग सेंटर येथील मैदानात गिरीधर याचा खून झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता,गिरीधर याचा मृतदेह असल्याचा आढळले. त्याचवेळी तिथे असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की,चार पुरुष आणि तरुणी यांनी गिरीधरवर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर सासवडच्या दिशेने पळून गेले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू असल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.