महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत ‘अक्षर’, ‘आपले छंद’, ‘कालनिर्णय’, ‘वनराई’ या अंकांना सवरेत्कृष्ट दिवाळी अंक पारितोषिक जाहीर झाले आहे. ‘ऋग्वेद’ अंकाला उत्कृष्ट बालकुमार अंकाचे, राजकुमार तांगडे यांच्या
‘कातडी’ या कथेला आणि हर्षदा पंडित यांच्या ‘मी सखा मेघदूत’ या लेखाला पारितोषिक मिळाले आहे. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये शनिवारी (१६ मार्च) सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. सदानंद बोरसे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार असल्याचे स्पर्धेचे निमंत्रक महेंद्र मुंजाळ यांनी कळविले आहे. या स्पर्धेत १२८ दिवाळी अंकांनी सहभाग नोंदविला होता.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2013 रोजी प्रकाशित
‘मसाप’ दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत ‘अक्षर’, ‘आपले छंद’, ‘कालनिर्णय’, ‘वनराई’ या अंकांना सवरेत्कृष्ट दिवाळी अंक पारितोषिक जाहीर झाले आहे.
First published on: 11-03-2013 at 01:14 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Announcement of results for masaap diwali issue competition