लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अवजड कंटेनर सोमवारी सकाळी उलटला. सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नाही. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मुंबईहून साताऱ्याकडे निघालेला अवजड कंटेनर बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास उलटला. कंटेनर उलटल्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच तातडीने सिंहगड रस्ता पोलीस ठाणे, तसेच वाहतूक शाखेतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अवजड कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची माहिती कंटेनरचालकाने दिली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. पोलिसांनी अवजड कंटेरनर हलविण्यासाठी क्रेन मागविली. क्रेनच्या सहायाने कंटेनर हलविण्यात आला.

आणखी वाचा-मुंबई शहर, पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. कंटेनर बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. नवले पुलावर अपघातांचे सत्र कायम आहे. बाह्यवळण मार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. तीव्र उतारावर भरधाव वेगातील वाहनांचे ब्रेक निकामी होऊन गंभीर स्वरुपाचे अपघात यापूर्वी घडले आहेत.