पुणे : अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे स्टेशन परिसरात पकडले. दोघांकडून १६ लाख ३२ हजार रुपयांचे एक किलो ८८ ग्रॅम चरस, दोन मोबाइल संच, दुचाकी असा १८ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी अमिर मसिउल्ला खान (वय २४, सध्या रा.  यासीन अपार्टमेंट, ताडीवाला रस्ता, मूळ रा. गंज दुडवारा, जि. कासगंज, उत्तरप्रदेश),  अतुल गौरव वानखडे (वय २२, सध्या रा. यासीन अपार्टमेंट, ताडीवाला रस्ता, मूळ रा. तथागतनगर, खामगाव, जि. बुलढाणा) यांना अटक करण्यात आली.

खान आणि वानखडे पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्ता परिसरात चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पाेलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून चरस जप्त करण्यात आले. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, उपनिरीक्षक एस. डी. नरके, संतोष देशपांडे, युवराज कांबळे, योगेश मांढरे, संदीप जाधव आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti narcotics squad seized charas worth 16 lakhs from two in pune station area pune print news rbk 25 zws
First published on: 04-01-2023 at 00:12 IST