लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: वैमनस्यातून पिस्तुलाच्या धाकाने तरुणाचे अपहरण करण्याची घटना मार्केट यार्ड भागातील गंगाधाम चौकात घडली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली.

प्रवीण जोगदंड (वय ३०) याने या संदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रवीण जोगदंड याची आरोपींशी भांडणे झाली होती. १० जून रोजी रात्री प्रवीण मार्केट यार्ड भागातील गंगाधाम चौकातून निघाला होता. त्या वेळी मोटारीतून आलेल्या चौघांनी प्रवीणला धमकावले. त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून मोटारीतून अपहरण केले. चौघांनी प्रवीणला मारहाण करुन त्याला सोडून दिले. पसार झालेल्या चौघा जणांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे यांनी दिली.