अतिवेगात दुचाकी चालवत धक्का देणाऱ्या टोळक्याने एका अपंग व्यक्तीसह दोघांना मारहाण केल्याचा घटना घडली आहे. धक्का लागल्याचा जाब विचारल्याने हा प्रकार घडला. सीसीटिव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण केलेले सर्व आरोपी हे अल्पवयीन आहेत. याप्रकरणी दोघांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय विनायक गायकवाड (वय ४८, रा. बुद्धघोष हौसिंग सोसायटी, जुनी सांगवी) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी सांगवी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. फिर्यादी विजय गायकवाड हे आपला मुलगा आणि अपंग भावासह सोसायटीच्या समोरील रस्त्यावर शतपावली करत होते. दरम्यान, भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील एकाचा पाय अपंग भावाला लागला. त्यानंतर गायकवाड यांच्या अपंग भावाने दुचाकी चालवणाऱ्याला तुला दिसत नाही का? असा जाब विचारला.

हे ऐकताच दुचाकी फिरुन पुन्हा त्यांच्याजवळ आली आणि दुचाकीवरील दोघांनी गायकवाड यांना शिवीगाळ करण्यास सुरू केली. हे टोळके एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी त्यांच्या साथीदारांना बोलावले आणि त्यानंतर ९ जणांनी अपंग भवासह मुलाला आणि फिर्यादी गायकवाड यांना कोयत्याचा धाक दाखवत लाथा बुक्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी हे किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. याचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asked for a dash on bike assault on the person with a disability
First published on: 09-11-2018 at 21:12 IST