पुणे : पुणे सातारा रस्त्यावर डी मार्टजवळ सोमवारी मध्यरात्री तीन दुकानात आग लागली. दुकानात झालेल्या स्पोटाची एटीएसकडून तपास सूरू करण्यात आला आहे.डी मार्ट दुकानाजवळ एका सोसायटीत तीन दुकाने आहेत.

दुकानात गॅस गिझर, चिमणी, फ्रीज. वॉशिंग मशीन आदी वस्तूची विक्री केली जाते. या दुकानात आग लागली आणि सिलिंडरचे स्फोट झाले. स्फोटात दुकानाची पडझड झाली तसेच दोनजण जखमी झाले असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.