पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचारीच्या नावाने फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून आणि त्यावर अश्लील व्हिडिओ अपलोड करून, त्याद्वरे संबंधित महिला पोलीस कर्मचारीची बदनामी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरातील अप्पर इंदिरानगर येथील रहिवासी असलेल्या महिला पोलीस कर्मचारीच्या नावाने दोन बनावट अकाउंट सोशल मीडियावर तयार करण्यात आले होते. त्यामध्ये काही बदनामीकार व आक्षेपार्ह अशी वाक्य असलेला मजकूर पोस्ट करून तो व्हायरल केला गेला होता.

illegal quarry operator in panvel
पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
hotel owner attempts suicide in front of police station
हॉटेल व्यावसायिकाचा पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न; काय आहे प्रकार?

या प्रकरणी फिर्यादी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर, संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती बिबवेवाडी पोलिसांनी दिली.