पिंपरी- चिंचवड: आळंदीमध्ये वाहतूक पोलिसांवर दगड घेऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. या घटने प्रकरणे अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आळंदीमध्ये नेहमीच वाहतूक कोंडी होते. यामुळे वाहतूक पोलिसांसोबत रिक्षा चालकांची हुज्जत ही नवीन बाब नाही. अज्ञात रिक्षाचालक आणि आळंदी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांच्यात वाद झाले. सतीश नांदुरकर यांना रिक्षा चालकाने दगडाने मारण्याचा प्रयत्न केला. हे व्हिडिओमधून समोर आल आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे लोकप्रतिनिधी असलेल्या आमदारांकडूनच पोलिसांना धमकी वजा इशारा दिला जात असल्याच समोर येत असताना दुसरीकडे पोलिसांवर दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे. आळंदीमधील पीएमटी चौकात पुलावर रिक्षा चालक थांबला होता. वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी त्याला हटकले. त्याला पुलावरून पुढे जाण्यास सांगितले.
कारण तिथून बस वळण्यासाठी अडचण होत होती. परंतु, त्या ठिकाणाहून तो जात नव्हता. अखेर पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर यांनी त्याला चापट मारली आणि याचा राग मनात धरून त्याने सतीश नांदुरकर यांच्यावर रस्त्यावर पडलेला दगड घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना काही सजग नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत,असून स्वतः सतीश नांदुरकर यांनी रिक्षा चालकाला समजावून पुढे जाण्यास सांगत आहेत. सतीश नांदुरकर यांनी त्याची माफी देखील मागितली. असं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. दरम्यान वाहतूक पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकाची रिक्षा जप्त केली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.