Coronavirus: ‘बारामती पॅटर्न’ सर्वांसाठी मार्गदर्शक; केंद्रीय पथकाकडून कौतुक

सध्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एक पथक करोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलं आहे.

पुणे : महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पथकाने करोनाशी लढा देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या बारामती पॅटर्नचे कौतुक केले.

कोरोनावर मात करण्‍यासाठी राबविण्‍यात येणारा ‘बारामती पॅटर्न’ सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत केंद्रीय पथकाने व्‍यक्‍त केले आहे. करोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकातील डॉ. अरविंद अलोणी व डॉ. पी. के. सेन यांनी बारामती येथे आज (गुरुवार) भेट दिली. यावेळी त्यांनी करोनाशी लढा देणारा ‘बारामती पॅटर्न’ सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचे म्हटले.

या केंद्रीय पथकाने येथील सिल्‍व्‍हर ज्‍युबिली रूग्णालयाची पाहणी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे व तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी त्यांना करोनाच्या‍ पार्श्वभूमीवर देण्‍यात येत असलेल्या आरोग्यविषयक सेवा सुविधांची त्यांना माहिती दिली. यानंतर त्यांनी बारामतीमध्ये ज्या भागात कोरोनोचे रूग्ण आढळले आहेत, त्या भागाचीही पाहणी केली.

या पाहणीनंतर डॉ. अलोणी व डॉ. सेन यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये बारामती तालुक्यात करोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण दाखविण्यात आले. हे सादरीकरण पाहून डॉ. अलोणी व डॉ. सेन यांनी ‘बारामती पॅटर्न’ खूपच प्रभावी असल्याचे सांगून तो इतरांसाठीही मार्गदर्शक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Baramati pattern for fighting to corona virus guide for all appreciation from the central squad of medical aau 85 svk

Next Story
आमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले