बँकेतून पैसे काढताना तुम्हाला आगाऊ रक्कम आली आहे. ती परत करा, अन्यथा तुमच्याविरोधात पोलिसांत तक्रार करू, अशी धमकी दिल्याने भीतीपोटी एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे घडली. महेश भानुदास मगुट (वय १९) असे मृत मुलाचे नाव आहे. आपल्या मृत्यूस पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक जबाबदार असल्याचे महेशने आपल्या हातावर लिहून ठेवले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेश मंगळवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काटेवाडी शाखेत आजीसोबत पैसे काढण्यासाठी गेला होता. बँकेतून उसाच्या बिलाचे ४९ हजार रूपये घेऊन घरी आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी नजरचुकीने बँकेची आगाऊ रक्कम तुमच्याकडे आल्याचे सांगत ती रक्कम बँकेत परत जमा करण्यास सांगितले. मात्र, महेशने आपल्याकडे आगाऊ रक्कम आली नसल्याचे सांगितले. त्यानंतरही अधिकाऱ्याने महेश व आजीला बँकेत बोलावून पोलीस कारवाई करण्याची धमकी दिली. घरी परतल्यानंतर महेशने पोलीस कारवाईच्या भितीने छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवून घेण्याचे काम सुरू होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baramatis youth committed suicide wrote suicide note on hand against pune dcc bank officers
First published on: 01-02-2018 at 09:53 IST