महाराष्ट्रातील जनता सत्ता केंद्रित राजकारण करण्याच्या युती आणि आघाडीच्या वृत्तीला कंटाळली आहे. राज्यातील जनतेला मनसे हाच पर्याय वाटत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ही लढाई जनता विरुद्ध आजचे आणि कालचे सत्ताधारी अशीच होणार आहे. त्यामुळे या लढाईला जिंकण्यासाठी तयार रहा, असे आदेश उपस्थित पदाधिकाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – बँक व्यवस्थापकाला धक्काबुक्की करून गोंधळ घालणारे अटकेत, लाडकी बहीण योजनेतील कागदपत्रांवरुन अरेरावी

हेही वाचा – समाज माध्यमातील ओळख महागात, भेटवस्तूच्या आमिषाने महिलेची १२ लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून बैठका, सभा दौरे घेतले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांनी संकल्प मंगल कार्यालयात पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठकीत घेतली. नेते शिरीष सावंत, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, बाबू वगासकर, अविनाश जाधव, अभिजित पानसे, सरचिटणीस बाळा शेडगे, किशोर शिंदे, अजय शिंदे, हेमंत संभुस, सचिव योगेश खैरे, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, सचिन चिखले उपस्थित होते.