लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष, अर्थतज्ज्ञ आणि इतिहास संशोधक डॉ. विवेक देबरॉय यांना भांडारकर प्राच्यविद्या संशाेधन संस्थेच्या वतीने यंदाचा सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर स्मृती  पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये, मानपत्र आणि भांडारकरी पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप  आहे. डॉ. विवेक देबरॉय यांनी महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे भाषांतर केले आहे.

भांडारकर संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृह येथे गुरुवारी (१३ जुलै) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते डॉ. विवेक देबरॉय यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया आणि कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धज्ञन यांनी दिली.

हेही वाचा… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; एक ऑगस्टला मोदी-पवार पुण्यामध्ये एकाच मंचावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यंदाच्या वर्षी पुरस्कार प्रदान कार्यक्रमात संशोधनात्मक काही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.