कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून बहुजन समाजातील मुलांना ज्ञान घेण्यापासून वंचित ठेवले जात आहे. आम्ही भिक्षा मागितली नाही. पण, एक-एक रुपयाची वर्गणी गोळा करून शाळा सुरू केली. आताही एक एक रुपया गोळा करून ज्ञानाच्या क्षेत्रात तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-विचारवंत आणि विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. भारत पाटणकर यांनी शनिवारी व्यक्त केला.

हेही वाचा >>>पुणे: गृहप्रकल्पांत सदनिकाधारकांना बंदिस्त वाहनतळ खरेदीचा भुर्दंड; सदनिकेऐवजी जमीनदराप्रमाणे शुल्क आकारण्याची मागणी

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..

सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित १४ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे उदघाटन नाट्यकर्मी मंजुल भारद्वाज यांच्या हस्ते कष्टकऱ्याच्या पुतळ्याच्या हाती लेखणी देऊन करण्यात आले. त्याप्रसंगी पाटणकर बोलत होते. चळवळीचे सचिव जालिंदर घिगे, संमेलनाचे संयोजक नितीन पवार आणि या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांना काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न; काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पाटणकर म्हणाले, देशातील संस्कृतीची पहाट ही वेदांतून नव्हे तर सिंधू संस्कृतीतून उगवली आहे. सिंधू संस्कृतीची लिपी अद्याप सापडली नसली तरी हा वारसा झिरपत पुढच्या पिढ्यांपर्यंत आला आहे. आमचे नाही ते आमच्यावर लादले गेले. लादलेले साहित्य भेदणार कसे तर शब्दांच्या सहाय्याने. त्यामुळे शब्दांची महती ओळखा. बदल तलवारी, बंदुकीतून नाही तर साहित्यातून होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जाणारे साहित्य बदल घडवू शकेल. ज्ञानाला ज्ञानानेच उत्तर द्यावे लागेल. घोषणेने नव्हे; तर दडपशाहीला वैराने नव्हे; तर नव्या समाजाची स्वप्ने पाहणाऱ्या साहित्य, कविता आणि संगीताने दिले पाहिजे.

हेही वाचा >>>पुणे: एसटी प्रवासी महिलेचे दागिने चोरीस

भारद्वाज म्हणाले, ज्ञान भाषेमध्ये नाही तर बुद्धिमध्ये असते. भाषेमध्ये ज्ञान असते तर चांगली शुद्ध भाषा बोलणारे शोषण करू शकले नसते. भाषा प्रेमाची असली पाहिजे. विवेक जागवणारे हरकारे हेच विद्रोही असतात.  संस्कृती ही नाटक, गीत, संगीत अशा कृतीतून अभिव्यक्त होत असते.

भाजप-शिवसेना युती सरकारच्या मार्गदर्शकांनी साहित्यिकांना बैल म्हटल्याची लाज वाटली आणि त्यातून विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा जन्म झाला. आमचा विद्रोह हा महात्मा फुले यांनी सुरू केला होता. विद्रोहाचे मूळ शोधायचे असेल तर तुकाराम आणि चोखा मेळा यांच्यापर्यंत जावे लागेल.-डाॅ. भारत पाटणकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-विचारवंत