scorecardresearch

Premium

पुण्यात पैशांचा पाऊस पाडणारा भोंदूबाबा!

याप्रकरणी भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhondu Baba stole 18 lakhs rupees businessman showering money hadapsar pune
पुण्यात पैशांचा पाऊस पाडणारा भोंदूबाबा! (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम, freepik)

पुणे: व्यावसायिकाकडे पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी करुन त्याच्याकडील १८ लाख रुपये चोरुन नेण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबा आयरा शाब, माधुरी माेरे, राॅकी वैद्य, किशोर पांडागळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराला आरोपींनी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी काही विधी करावे लागतील, अशी बतावणी केली होती.

Pimpri, Instagram friendship, theft, Woman flees, man's phone, meetup,
मैत्रिणीने ‘इंस्टाग्राम’ वर मॅसेज करुन भेटायला बोलविले आणि….
Poison, Well, Ekburji, Washim, crime,
वाशिम : विहिरीत अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकले…
suresh wadkar pa threatened and demand for extortion money of rs 20 crores in land case
नाशिक: गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणात २० कोटींच्या खंडणीची मागणी – स्वीय सहायकास धमकी
evm unit stolen from tehsil office in pune district
सासवडमधील तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्र चोरीला; सगळा प्रकार ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांत कैद

हेही वाचा… मेट्रोकडे पुणेकरांची पाठ! प्रवासी संख्येला घरघर; उत्पन्नातही मोठी घट

आरोपींनी व्यावासयिकाला हडपसरमधील ससाणेनगर परिसरात विशाल बिनावत याच्या घरी नेले होते. व्यावसायिकाला बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी त्याच्याकडील १८ लाखांची रोकड असलेली पिशवी चोरली. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhondu baba stole 18 lakhs rupees from the businessman on the pretense of showering him with money in hadapsar pune print news rbk 25 dvr

First published on: 04-12-2023 at 10:01 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×