पुलवामा हल्ला प्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. बिहार एटीएसने ही कारवाई केली आहे. बिहार एटीएसने चाकणमध्ये ही कारवाई करण्यात आली. ज्याला अटक करण्यात आलं आहे त्याचे नाव समजलेले नाही. मात्र ज्या माणसाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे लष्कराची माहिती आणि इतर महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.  बिहार एटीएसने त्याला कोर्टात हजर केलं होतं. पुढील तपासासाठी त्याला बिहारला नेण्यात आला आहे. भारतीय लष्कराची माहिती आणि नकाशा असेही त्याच्याकडे सापडलं आहे. आपल्याला ठाऊक आहे की १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे हल्ला झाला होता. ज्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर एअर स्ट्राईक करून भारताने या कारवाईला उत्तर दिलं होतं. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिहार पोलिसांनी सोमवारी पुलवामा हल्ल्याप्रकरणी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पाटणा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. काही गुप्तचर संस्थांनी मिळालेल्या माहितीनंतर बिहार पोलिसांनी ही कारवाई सोमवारी केली आहे. या दोघांचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान आजही बिहार एटीएसने पुण्यातून एकाला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केल्यानंतर आता बिहार पोलीस त्याला बिहारला घेऊन गेले आहेत. तिथे त्याची चौकशी केली जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar ats arrested one person from pune regarding pulwama attack
First published on: 28-03-2019 at 18:08 IST