पुण्यातील वानवडी परिसरात भरधाव दुचाकी वीजेच्या खांबावर आदळून दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. अपघातात सहप्रवासी तरुण जखमी झाला.

महम्मद अली झाकीर अली सय्यद (वय १७, रा. के. के. क्लासिक बिल्डींग, भवानी पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार मुलाचे नाव आहे. अपघातात सहप्रवासी आरफान आयुब शेख (वय २३, रा. लोहियानगर) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुचाकीस्वार सय्यद आणि त्याचा मित्र शेख भरधाव वेगाने दुचाकीवरून जात होते. वानवडीतील राष्ट्रीय रक्षा वित्तीय प्रबंधक अकादमीसमोर दुचाकीस्वार सय्यद याचे नियंत्रण सुटले. दुचाकी वीजेच्या खांबावर आदळली. अपघातात सय्यद आणि शेख गंभीर जखमी झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसचे ११ डबे घसरले, एका प्रवाशाचा मृत्यू

अपघातानंतर पोलिसांनी दोघांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच सय्यद याचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक सोनालिका साठे तपास करत आहेत.