पुणे : बालभारती ते पौड फाटा या संदर्भात भाजपाने स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ‘मोजक्या लोकांना’ याचा फायदा व्हावा, या उद्देश्यानेच वेताळ टेकडीवर रस्ता करण्याचा घाट घातला होता. याला मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. यावर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी समंजस भूमिका घेत असल्याचे जाहीर करताना, स्थानिकांची मते पदरात पाडून घेतली. निवडणूक संपताच पुन्हा एकदा हुकूमशाही प्रवृत्ती दाखविताना ‘डंके की चोट पर’ हा रस्ता करून दाखविणार असे ट्वीट केले. यामुळे मते पदरात पाडून घेण्यासाठी भाजपा किती खालच्या मानसिकतेने काम करतो असे स्पष्ट होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी केला.

भाजपाने गेल्या पाच वर्षात महानगरपालिकेत सत्ता रबविताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. कोविड काळात तर भाजपाच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेचा, राज्याचा आणि केंद्राचा पैसा आपल्या खिशात टाकला. भाजपाने निवडून आलेल्या ठिकाणी देखील विकास केला नाही. कोथरूड हा बालेकिल्ला असलेल्या भाजपाने कोणताही विकासाचा प्रकल्प पूर्ण केला नाही. मेट्रो प्रकल्प देखील केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून केला होता, मात्र, स्थानिक पदाधिकारी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. चांदणी चौक हा तांत्रिकदृष्ट्या बारामती लोकसभा मतदार संघात येतो. यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही प्रयत्न केले होते. त्यामुळे दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचे काम भाजपने नेहमीच केले आहे.

हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीवर पतीचे अत्याचार, राक्षसी कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भांडारकर रस्त्यानजीक असणारी वेताळ टेकडी फोडून बालभारती ते पौड फाटा हा रस्ता कारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक मतदार नाराज झाला, असे असूनही भाजपाने केवळ निवडणुकीपुरता या विषयावर पडदा टाकला. मात्र, आपली हुकूमशाही पद्धती पुन्हा राबविताना रस्ता करण्याचा प्रयत्न करणार आहेत. अशा पर्यावरणाची हानी पोचविणाऱ्या, भाजपचा आम्ही निषेध करतो. भविष्यात भाजपाने हा रस्ता करण्याचा प्रयत्न केल्यास, याच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा थरकुडे यांनी दिला.