मुख्यमंत्र्याची खुर्ची पाहिजे या भावणेमुळे अनेक जण दुरावले
उद्धव ठाकरे हे भाजपाबद्दल चांगलं बोलतील हे आता अशक्य आहे. याच जन्मी नाही तर पुढील जन्मी उद्धव ठाकरे यांनी भाजपाबद्दल चांगलं बोलावं ही आता आमची अपेक्षा नाही असा टोला राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. भाजपा हा पक्ष भ्रष्ट जनता पक्ष आहे अशी टीका त्यांनी भाजपावर केली केली होती. त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. तसेच, आम्हाला वडील मुख्यमंत्री आणि मुलगा पर्यावरणमंत्री असे सरकार आम्हाला चालवायचे नाही असा चिमटा देखील ठाकरे यांना काढला आहे. पुण्याच्या आळंदीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणाऱ्या ज्ञानोबा – तुकाराम २०१९-२२ पुरस्काराचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाहीर सभा पार पडली. त्यांनी भाजपावर चौफेर टीका केली.
मी वडिलांच्या म्हणजे बाळासाहेब ठाकरे तर भाजपाने नरेंद्र मोदींच्या नावाने आगामी निवडणुका लढवाव्यात असे जाहीर आव्हान भाजपाला दिले. यावर मुनगंटीवार म्हणाले की, त्यांना त्यांच्या वडिलांच्या नावाने लढण्याचा अधिकार आहे. आम्ही विकासाच्या, राष्ट्रवादाच्या आणि देशाचा गौरव वाढावा म्हणून आम्ही लढतो आहोत. आमच्यात कोणालाही वडील मुख्यमंत्री आणि मुलगा पर्यावरणमंत्री असे सरकार आम्हाला चालवायचे नाही. असा चिमटा त्यांनी काढला आहे. पुढे ते म्हणाले की, त्यांच्या पक्षात असलेला नेता प्रामाणिक आणि आमच्याकडे आला की तो भ्रष्ट होतो अस तर असू शकत नाही. स्वतः च्या पक्षात असला की तो नेता उत्तम आणि पाठ दाखवलीकी भ्रस्ट अस उद्धव ठाकरे यांच सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना खुर्ची दूर गेल्याच दुःख आहे. मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाहिजे या भावणेमुळे अनेक जण त्यांच्यापासून दुरावले आहेत. अस मुनगंटीवार म्हणाले. पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे भाजपा पक्षाबद्दल चांगलं बोलू शकत नाहीत. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मी त्यांनी चांगलं बोलावं ही आता आमची अपेक्षा नाही.