पुणे : देशाचा मूलभूत विचार हा हिंदुत्व आहे. तो आचरणात आणणे आणि जगाला दाखवणे गरजेचे आहे. देशाला हिंदुत्व बोलणाऱ्या नाही, तर हिंदुत्व जगणाऱ्या लोकांची गरज आहे,” असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जयंतीनिमित्ताने ‘वंदे मातरम’चे गाढे अभ्यासक मिलिंद सबनीस लिखित ‘ऋषी बंकिमचंद्र’ या ग्रंथाचे प्रकाशन देवधर यांच्या हस्ते झाले. यावेळी  ‘ऋषी बंकिमचंद्र : आजच्या संदर्भात’ या विषयावर देवधर बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी, ‘जटायु अक्षरसेवा’चे संतोष जाधव, प्रकृती केअर फाउंडेशनचे ज्ञानोबा मुंढे आदी यावेळी उपस्थित होते.

हिंदुत्व हा देशाचा मूलभूत विचार हा हिंदुत्व आहे. तो आचरणात आणणे आणि जगाला दाखवणे गरजेचे आहे. आपला समाज हा विचार आणि आचार मानणारा समाज आहे. माणसाचे आचरण ठरवते ती व्यक्ती कशी आहे. देशाने दिलेला विचार जगाने दिलेल्या विचारापेक्षा पूर्णत: वेगळा आहे. युगे बदलली तरी आपला विचार बदलणार नाही, असे सुनील देवधर यांनी सांगितले.

सबनीस म्हणाले,  गेल्या २५ वर्षांपासून वंदे मातरमसाठी स्वत:ला वाहून घेतले. वंदे मातरमला चार लोकांचा स्पर्श झाला. त्यात ऋषी बंकिमचंद्र यांचा सहभाग होता. या लोकांनी भारताचा इतिहास घडवला आहे. स्वातंत्र्य लढ्याला वंदे मातरमच्या रुपाने शस्त्र मिळाले.

पवार देश तोडणारे नेते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील देवधर यांचा पुणेरी पगडी घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत पुणेरी पगडी त्यांनी परिधान केली. शरद पवार यांना पुणेरी पगडी घातली की राग येतो, असे मला कळले. त्यामुळे मी पगडी घालूनच भाषण केले,” असे स्पष्टीकरण भाषणात देताना पवार  जातीवादी आणि देश तोडणारे नेते असल्याची टीका त्यांनी केली.