पिंपरी- चिंचवडमध्ये लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीचे न्यूड फोटो तिच्या बहिणीला पाठवून बदनामी करणाऱ्या प्रियकराच्या विरोधात दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित कांतीलाल भोसले असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पीडित आणि आरोपी दोघे एकत्र राहायचे त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. रोहित प्रेयसीकडे लग्नासाठी तगादा लावत होता. या कारणावरून त्यांच्यात भांडण होऊन विभक्त झाले. अशी माहिती दिघी पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीने सोबत राहण्यास नकार दिल्यावरून तिचे न्यूड फोटो तिच्या बहिणीला पाठवणाऱ्या प्रियकराच्या विरोधात प्रेयसीने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रियकर अद्याप फरार आहे. त्याचा शोध दिघी पोलीस घेत आहेत.  प्रियकर रोहित आणि पीडित प्रेयसी एकत्र राहायचे. परंतु, रोहित हा प्रेयसीला लग्नासाठी तगादा लावत होता. यालाच कंटाळून प्रेयसी त्याच्यापासून विभक्त झाली. प्रेयसीने पुन्हा एकत्र राहण्यास नकार दिला.

हेही वाचा >>> पुणे : ‘द केरला स्टोरी’ चित्रपट दाखविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियकर रोहित मात्र प्रेयसी पुन्हा सोबत राहावी यासाठी तिचा पाठलाग करत होता. तिला शिवीगाळ करायचा, काही वेळा प्रेयसीला मारहाण केल्याचे देखील पोलिस तक्रारीत म्हटल आहे. अखेर प्रेयसीची बदनामी करण्याच्या उद्देशाने तिचे न्यूड फोटो तिच्या बहिणीच्या व्हाट्सअप नंबर वर पाठवले, असा उल्लेख तक्रारीत आहे. त्यानंतर मात्र प्रेयसीने रविवारी दिघी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली  आहे. आरोपी प्रियकर रोहित चा शोध पोलीस घेत आहेत.