पुणे : सांगोला ते स्वारगेट एसटी बस हडपसर येथील रामटेकडी पुलावरून १०० फुट अंतर पुढे आल्यावर एसटीचा ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. या घटनेत पाच वाहनांना धडक दिली असून चार ते पाच नागरिक जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला ते स्वारगेट एसटी बस हडपसर येथील रामटेकडी पुलावरून रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास १०० फुट अंतर पुढे आल्यावर चालकाने वाहकाला सांगितले की, ब्रेक फेल झाला आहे. त्यावेळी बसमध्ये ३० प्रवासी होते. त्यावेळी सर्व प्रवासी घाबरले आणि आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा-पुणे : फ्लेक्स फाडल्यामुळे गणेश पेठेत तरुणाचा खून, गुन्हे शाखेकडून दोघे अटकेत

बसमधील सर्व प्रवाशांना समजण्याच्या आतमध्ये पुढील दुचाकी ३ आणि २ चारचाकी अशा वाहनांना जोरात धडक दिली. या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले असून जखमींना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातामुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brake failure of st bus near ramtekdi bridge five vehicles hit svk 88 mrj
First published on: 21-11-2023 at 20:53 IST