पिंपरी- चिंचवड: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सख्खा भावाचा कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना चऱ्होली पसरीसरात घडली. या प्रकरणात आरोपी असलेल्या सोमनाथ दादा लकडे आणि शीतल धनु लकडे या दोघांना अटक केली आहे. सोमनाथ हा हत्या करण्यात आलेल्या धनु दादा लकडे चा सख्खा भाऊ.

धनु मोठा भाऊ असल्याने अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. लहान भाऊ सोमनाथ ला सोबत घेऊन तो मेंढपाळ व्यवसाय करायचा. याच दरम्यान १९ वर्षीय सोमनाथचे २५ वर्षीय वहिनी शीतल धनु लकडे सोबत अनैतिक संबंध सुरू झाले. एकाच घरात राहत असल्याने ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. याबाबत दबक्या आवाजात आजूबाजूला चर्चा सुरू झाली. हीच कुजबुज धनु च्या कानी पडली. पत्नी शीतल आणि भाऊ सोमनाथ यांना त्याने समजवण्याचा प्रयत्न ही केला. प्रकरण मारहाणीपर्यंत पोहचल. याच रागातून हत्या झालेला धनु हा पत्नी शीतल आणि लहान भाऊ सोमनाथ ला मारहाण करायचा. हे प्रकरण मिटवण्यासाठी कौटुंबिक बैठक झाली. तोडगा निघत नव्हता.

दोघांमधील नातं थांबायचं नाव घेत नव्हतं. अखेर, शीतल आणि सोमनाथने भावाचा काटा काढून त्याला कायमच बाजूला करायच ठरलं. शनिवारी राहत असलेल्या काही अंतरावर हरवलेल्या शेळ्या शोधण्यासाठी दोघे भाऊ गेले. सोमनाथ तयारीने होता. आपला सख्खा भाऊ आपला जीव घेईल याची पुसटशी कल्पना धनु ला नव्हती. वहिनीवर जडलेला जीव आणि समोर भाऊ अशी अवस्था अवघ्या १९ वर्षीय सोमनाथची झाली. बेसावध असलेल्या भावावर सोमनाथने डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले. एक- एक करत अनेक घाव घातल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनुने प्राण सोडले. तिथून आरोपी सोमनाथने पळ काढला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या दिवशी आपला भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिघी पोलिसात आरोपी सोमनाथ लकडे यानेच दिली. परंतु, म्हणतात ना “कानून के हाथ लंबे होते है”. गुंडा विरोधी पथक आणि पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी अनेकांशी संवाद साधला. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही च्या आधारे पोलीस आरोपी सोमनाथ पर्यंत पोहचले. आपल्याच वहिणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून दोघांनी कट रचून हत्या केल्याचं कबूल केलं. या प्रकरणी आरोपी सोमनाथ लकडे आणि शीतल धनू लकडेला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत. ही कामगिरी गुन्हे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.