पुणे : कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) अल्पसंख्यांक समाजातील युवक-युवतींसाठी अल्पमुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम १३ मार्चपासून आयोजित करण्यात आले आहे.

अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम, शिख, जैन, पारसी, ख्रिश्चन, तसेच बौद्ध, नवबौद्ध, हिंदू-महार या घटकांतील काही कारणास्तव पूर्णवेळ किंवा दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण पूर्ण करू न शकणाऱ्या बेरोजगार तरुण-तरुणी किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अधिकचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी या अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. सुरुवातीला अल्पसंख्याक समाजातील युवकांसाठी एकूण सहा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यात फिल्ड टेक्निशियन-एसी, सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग, ड्राफ्ट्समन- मेकॅनिकल, क्यूसी इन्स्पेक्टर लेव्हल ४, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन लेव्हल ३, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग-शील्डेड मेटल आर्क वेल्डिंग वेल्डर या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

bmc swimming pool marathi news
मुंबई महानगरपालिकेचे दहा तरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले; २४ एप्रिलपासून ऑनलाईन नावनोंदणी, प्रशिक्षण कालावधी २१ दिवसांचा
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Priority of schools
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित; शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना

हेही वाचा – लष्कर भागातील जॅार्ज हॅाटेलमध्ये चोरी

हेही वाचा – आंबेगाव पठार परिसराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद

अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे, शिक्षण किमान आठवी ते दहावी उत्तीर्ण ही पात्रता आहे. प्रत्येक व्यवसायातील प्रवेश क्षमता ३० आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, आधार कार्डची छायांकित प्रत, अल्पसंख्याक उमेदवारांसाठी अल्पसंख्याक असल्याचा पुरावा आदी कागदपत्रे, दोन छायाचित्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी ९८५०१५१८२५, ९६३७३९५८३३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, अशी माहिती उपसंचालक रमाकांत भावसार यांनी दिली.