एका कंपनीने ७० कोटी रुपयांची बनावटे बिले सादर करून वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) १२.५९ कोटी रूपयांचा परतावा मिळवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ओलायन डेस्कॉन इंडस्ट्रियल कंपनीच्या प्रवर्तकाला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जीएसटीच्या महाराष्ट्र विभागाच्या पुणे तपास पथकाने केली आहे.

हेही वाचा >>>पुणे जिल्ह्यातील ६५३ शाळांतील विद्यार्थी लेखन, वाचन पातळीवर अक्षम, निपुण भारत अंतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ
Vodafone Idea (VIL) , FPO, public investors
‘व्होडा-आयडिया’ची सुकाणू गुंतवणूकदारांकडून ५,४०० कोटींची निधी उभारणी, आजपासून प्रत्येकी १०-११ रुपयांनी समभाग विक्री
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी
ED
‘व्हीआयपीएस’ कंपनीची २४ कोटींची मालमत्ता जप्त; पुण्यात ‘ईडी’ची कारवाई; संचालक दुबईत पसार

सिराजउद्दीन कमलउद्दीन चौधरी (वय २९) असे अटक केलेल्या उद्योजकाचे नाव आहे. त्याच्या ओलायन डेस्कॉन इंडस्ट्रियल कंपनीचे चार पुरवठादार अस्तित्वातच नाहीत. तरीही त्याने बनावट बिले सादर केली होती. त्याने एकूण ७०.२२ कोटी रूपयांची बिले सादर केली. त्यासाठी त्याने मालाच्या खरेदीच्या पावत्या सादर केल्या नव्हत्या. त्याने या प्रकारे १२.५९ कोटी रुपयांचा जीएसटी परतावा ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ अंतर्गत मिळवला.
हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर सिराजउद्दीन हा फरार झाला होता. तो उत्तर प्रदेशात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी विशेष तपास पथक तयार करून उत्तर प्रदेशात पाठवण्यात आले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने या पथकाने सिराजउद्दीनचा ठावठिकाणा शोधला. त्याला १० मार्चला अटक करण्यात आली. तिथून त्याला पुण्यात आणण्यात आले.

हेही वाचा >>>पुणे: कात्रजमधील आंबेगाव परिसरात कोयता गँगची दहशत; वैमनस्यातून तरुणावर हल्ला

चालू आर्थिक वर्षात ६८ जणांना अटक
महाराष्ट्र जीएसटी विभागाने चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये केलेली ही ६८ वी अटक आहे. करचुकवेगिरी करणाऱ्यांवर विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. अनेक जण करचोरी करून इतर राज्यांत जाऊन लपतात. अशा आरोपींनीही अटक कऱण्यात आली आहे.