पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण येथे एटीएम फोडण्यासाठी स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली असून बॉम्ब निकामी करणारं बीडीडीएसचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. ही घटना मध्यरात्री चाकणमध्ये ही घटना घडली असून स्फोटामुळे परिसर हादरला असल्याचं समोर येत आहे. एटीएमजवळ स्फोट घडवून आणल्यानंतर अज्ञातांनी पैसे घेऊन पोबारा केला आहे. काही विशिष्ट स्फोटके वापरून हा स्फोट घडवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चाकणच्या भांबोली येथे अज्ञात चोरट्यांनी हा स्फोट करून एटीएम फोडलं आणि पैसे घेऊन चोरटे पसार झाले आहेत,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, स्फोट अत्यंत भीषण स्वरुपाचा होता. यात एटीएमचे शटर तुटले असून परिसर या स्फोटाच्या आवाजाने हादरला आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच एटीएम असणाऱ्या इमारतीमध्येच मागील बाजूस राहणार इमारतीचा मालक तिथे आला. पण अज्ञात व्यक्तींनी त्यांना धमकावून परत घरी जाण्यास सांगितले. मालक देखील घाबरून घरी परत गेला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून बीडीडीएसला देखील पाचारण करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chakan blast outside atm for looting kjp scsg
First published on: 21-07-2021 at 10:24 IST