पुणे : पुणे शहर परिसरात १७ टेकड्या असून त्यावर सातत्याने लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी सुरक्षितेतच्यादृष्टीने प्रशासन, महानगरपालिकाने नागरिकांनासोबत घेऊन सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, याकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी सूचना उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. टेकड्यांवरील अनाधिकृत बांधकामावरही कारवाई करावी, असे निर्देश देत महानगरपालिकेशी संबंधित विषयांसदर्भात २३ जानेवारी रोजी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोथरुड मधील म्हातोबा टेकडीवरील आगीच्या तीन घटनांनतर पुणे शहरातील टेकड्यांची सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वनभवन येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपवसंरक्षक महादेव मोहिते, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, विभागीय वन अधिकारी स्नेहल पाटील, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ, नागरिक उपस्थित होते.

आणखी वाचा-पुणे : बदला घेण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड, एरंडवणेतील डीपी रस्त्यावर गुन्हे शाखेची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर सुमारे ६ हजार ५०० वृक्षांची लागवड केली होती. त्यांना आग लावून सुमारे २ हजार ५०० वृक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. टेकड्यावरील झाडांची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी तणांची विल्हेवाट लावण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत. संरक्षक भिंतीची जलदगतीने कामे पूर्ण करावे. वन क्षेत्र संरक्षित करावेत, प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी. टेकड्यांवरील झाडांच्या देखभालीसाठी टेकड्यावरील ठिकाणे निश्चित करुन उच्चक्षमतेचे सोलारयुक्त सीसीटीव्ही कॅमरे बसवावेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात गस्त घालणाऱ्या सुरक्षारक्षकाची संख्या २ वरुन ८ करावी आणि त्यांना गस्त घालण्यासाठी लागणाऱ्या दुचाकी, सौर दिवे आदी बाबींकरीता लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.