दिलगिरी व्यक्त करूनही शाई हल्ला करण्यात आला. लोकशाही पद्धतीने निषेध नोंदविण्यास हरकत नाही. मात्र, शाई फेकण्याची घटना कोणत्या चौकटीत बसते, अशी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. हल्ला पूर्वनियोजित होता. पडद्या आडून हे कृत्य करणारे हल्लेखोर सापडले आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे रेल्वे स्थानकातून अडीच वर्षांच्या बालकाचे अपहरण

Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Chandrashekhar Bawankule on Gajanan Kirtikar
‘विरोधकांच्या मागे लागणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या आरोपाला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

चंद्रकांत पाटील यांनी स्पर्धा परीक्षा संमेलनासाठी उपस्थित राहण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर झालेल्या शाई फेक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री, नेते छगन भुजबळ जामिनावर बाहेर आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>पुणेकरांनी अनुभवले वाहनमुक्त रस्ते !; लक्ष्मी रस्त्यावर पादचाऱ्यांचे राज्य

शाई फेकीची घटना पूर्वनियोजित होता. त्याचे सर्व पुरावे मिळाले आहेत. काही वर्षांपूर्वी डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. हल्लेखोराने डोळ्यावर शाई टाकली. लोकशाही पद्धतीने निषेध करण्यास विरोध नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबद्दल माझ्या मनात कायमच आदर आहे. मी केलेल्या विधानाबाबतही मी दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, दिलगिरी व्यक्त करूनही हा भ्याड हल्ला करण्यात आला. हा प्रकार घटनेच्या कोणत्या चौकटीत बसतो, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली.

‘शाई फेक कित्येकांवर होते. मग हल्लेखोरांना ३०७ हे गंभीर कलम का लावण्यात आले,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती. त्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे. पोलीस प्रशासनाने त्यांचे काम केले आहे. न्यायदेवतेवर विश्वास आहे. माझ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, हे भुजबळ यांना कोणीतरी सांगावे.