पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थी केंद्रस्थानी आहे. जगातील सर्वाधिक नवउद्यमी भारतात आहेत. आविष्कारसारख्या महोत्सवातून नव्या संशोधनाला चालना मिळेल. त्याद्वारे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले. तसेच यशस्वी संशोधन प्रकल्पांची उद्योग क्षेत्राशी सांगड घालून नवउद्यमींना सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या आविष्कार या आंतरविद्यापीठीय संशोधन स्पर्धेला पाटील यांनी भेट दिली. तसेच विद्यार्थी संशोधकांशी संवाद सधला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर आदी उपस्थित होते.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

हेही वाचा – महाराष्ट्रातील कुस्तीपटूंसाठी Good News ; राज्य सरकारने वाढवले मानधन, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा!

हेही वाचा – गृहमंत्र्यांनी केवळ बोलण्यापेक्षा कारवाई करावी, अजित पवार यांचा फडणवीसांना टोला

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जी-२० परिषदेबाबत पाटील म्हणाले, भारताच्या नेतृत्वात जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. जी-२० परिषदेच्या माध्यमातून आपले भविष्य घडवण्यासाठी संधी मिळाली आहे.