scorecardresearch

पुणे : विद्यापीठाच्या वेळापत्रकात बदल, सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या जी-२० परिषदेतील कार्यक्रमामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.

पुणे : विद्यापीठाच्या वेळापत्रकात बदल, सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या जी-२० परिषदेतील कार्यक्रमामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत विद्यापीठाचे प्रशासकीय काम करण्यात आले. या परिषदेसाठी विद्यापीठात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जी-२० परिषदेतील परदेशी पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्रीच्या भोजनाची व्यवस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऐतिहासिक वास्तूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्रशासकीय कामकाजाच्या वेळापत्रक बदल केला. सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत विद्यापीठाचे कामकाज करण्यात आले. जी-२० परिषदेतील पाहुणे दुपारी तीन वाजल्यापासून विद्यापीठात येणार असल्याचे त्यापूर्वी विद्यापीठाचा परिसर मोकळा करण्यात आला.

हेही वाचा >>> पुणे : जी- २० परिषदेसाठी लोकप्रतिनिधींना डावलले; राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण यांची नाराजी

परिषदेच्या सुरक्षिततेसाठी विद्यापीठात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी लोकसत्ताला दिली. गेल्या दोन दिवसांपासूनच विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. विद्यापीठात जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची मुख्य प्रवेशद्वारावर तपासणी करण्यात येत होती.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 15:06 IST

संबंधित बातम्या