लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत २४.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

आणखी वाचा-पिंपरी: हिंजवडी परिसरातील वाहतुकीत बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयसीएआयने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. फाउंडेशन परीक्षा जूनमध्ये देशभरातील पाचशे केंद्रांवर घेण्यात आली होती. देशभरातील एक लाख १७ हजार ६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एक लाख ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्यांमध्ये ५५ हजार ५७३ मुले, ४७ हजार ९४४ मुली होत्या. त्यापैकी एकूण २५ हजार ८६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये १४ हजार ४४८ मुले (२५.९९ टक्के) तर ११ हजार ४१२ मुली (२३.८० टक्के) आहेत. http://www.icai.nic.in/ या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध असल्याचे आयसीएआयने स्पष्ट केले.