पुणे : आर्थिक अडचणीत असल्याची बतावणी करुन एकाने मैत्रिणीची ८५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकाश शांताराम नाईक (वय २७, रा. शिवणे, वारजे माळवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि आरोपी आकाश यांची मैत्री आहे. आकाशने आर्थिक अडचणीचे कारण सांगून मैत्रिणीकडून वेळोवेळी ८५ हजार रुपये उकळले. मैत्रिणीला पैशांची गरज असल्याने तिने त्याच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating girlfriend pretending financial trouble crime against one pune print news ysh
First published on: 04-07-2022 at 14:39 IST