पुणे : बालरोग तज्ज्ञांच्या बाह्यरुग्ण विभागांमध्ये सध्या सर्व वयोगटातील लहान मुले ताप, सर्दी, खोकला या आजाराने बेजार होऊन उपचारांसाठी येत आहेत. मुलांमध्ये तीन ते चार दिवस तीव्र ताप, अंगदुखी, भूक मरणे, उलट्या अशी लक्षणे दिसून येत आहेत. मुलांमध्ये आढळणारे आजार हे प्रामुख्याने विषाणूजन्य असून पालकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून लहान मुलांची आजारपणे वाढत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ताप, सर्दी, खोकला, जुलाब आणि उलट्या यांचे प्रमाण अधिक आहे. प्रामुख्याने इन्फ्लूएन्झा या विषाणूच्या संसर्गामुळे हे होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टर नोंदवत आहेत. ज्या मुलांनी इन्फ्लूएन्झाची लस घेतली आहे, त्यांना तुलनेने संसर्गाचे प्रमाण कमी असल्याचेही बालरोग तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मुलांमध्ये करोनाविरोधी प्रतिकारशक्ती प्राप्त झाली असल्याने त्यांना करोना संसर्ग आढळला, तरी त्याची तीव्रता सौम्यच असल्याचेही तज्ज्ञ स्पष्ट करत आहेत.

BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
99 fights among psychiatric patients in three years in Nagpur
नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?

राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, फ्लूची लक्षणे असलेल्या मुलांना १०३ ते १०४ पर्यंत ताप येतो. हा ताप पहिले तीन दिवसपर्यंत राहतो. चारपाच दिवस ताप न उतरल्यास, दम लागत असल्यास; तसेच श्वासाचा वेग वाढल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय चाचण्या कराव्या. उलट्या, जुलाब होत असल्यास मुलांना मीठ-साखर घातलेले पाणी पिण्यास द्यावे. नारळाचे पाणी, ताक, भाताची पेज यांमुळेही मुलांना शक्ती राखण्यास मदत होते. सध्या दररोज बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे. मात्र, बहुतांश मुले ही घरच्या घरी औषधोपचार आणि पुरेशा विश्रांतीने पूर्ण बरी होत आहेत. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहावे, असेही डॉ. प्रमोद जोग यांनी स्पष्ट केले.

काय काळजी घ्यावी?

– ताप, सर्दी, खोकला अशी विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यासडॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

– लक्षणे आढळल्यास मुलांना शाळेत पाठवू नये.

– मुलांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये यासाठी भरपूर पाणी द्यावे

– ताक, भाताची पेज, मीठ-साखर-पाणी यांसारखे द्रव पदार्थ मुलांना द्यावे.

– मुलांना श्वसनाचा त्रास, दमा, धाप लागणे अशी लक्षणे असल्यास विशेष खबरदारी घ्यावी.

डेंग्यूबाबत सावधगिरी आवश्यक मुलांचा ताप उतरत नसेल, अशक्तपणा अधिक असेल, पाठ, पोटऱ्या दुखत असतील, तर त्यांची डेंग्यूची तपासणी करावी. डेंग्यूची शक्यता असल्यास ताप जास्त मात्र सर्दी, खोकला नसतो. त्यामुळे लक्षणांचे बारकाईने निरीक्षण करणेही आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.