पाण्याच्या बाटलीच्या किंमतीवरुन वाद ; दोन गटात हाणामारी ; चौघे अटकेत

नौशाद शेख पानपट्टी चालक असून जहांगीर  रुग्णालयसमोर त्याचे पानपट्टीचे दुकान आहे.

पाण्याच्या बाटलीच्या किंमतीवरुन वाद ; दोन गटात हाणामारी ; चौघे अटकेत
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : पानपट्टीच्या दुकानात पाण्याची बाटली खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चालकाशी वाद झाला. या कारणावरुन तरुणांच्या दोन गटामध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली.

या प्रकरणी नौशाद शेख हुसेन खान,वसीम सय्यद , कासीम शेख (सर्व रा. ताडीवाला रोड) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत स्वप्नील दत्तु कांबळे (वय २३, रा. विश्वदीप तरुण मंडळाजवळ, ताडीवाला रोड) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नौशाद शेख पानपट्टी चालक असून जहांगीर  रुग्णालयसमोर त्याचे पानपट्टीचे दुकान आहे. कांबळे हा मित्रासह सिगारेट आणि पाण्याची बाटली घेण्यासाठी दुकानात गेला होता. त्यावेळी पाण्याची बाटली तसेच सिगारेटच्या किंमतीवरुन त्यांचा वाद झाला. तेव्हा नौशादने त्याला मारहाण केली. त्यानंतर कांबळे मित्रांना घेऊन पहाटे पावणेतीनच्या सुमारास पानपट्टीच्या परिसरात आला. कांबळे, त्याचे मित्र आणि आरोपी शेख, खान, सय्यद, शेख यांच्यात हाणामारी झाली. याबाबत वसीम हाजी मलंग सय्यद (वय ३०, रा. प्रायव्हेट रोड) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांकडून स्वप्नील कांबळे, निलेश धनगर, कुमार कोळी, (सर्व रा. ताडीवाला रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला निवडणूक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी