पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या ९ फेब्रुवारी रोजी राज्यभरात शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून, विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, आठवीसाठी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती म्हणून अनुक्रमे पाच हजार रुपये आणि सात हजार रुपये देण्यात येतात. पाचवी आणि आठवीसाठी ५० गुणांची प्रथम भाषा, १०० गुणांची गणिताची अशी एकूण १५० गुणांची परीक्षा सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा या वेळेत होणार आहे. तर ५० गुणांची तृतीय भाषा, १०० गुणांची बुद्धिमत्ता चाचणीसाठीची १५० गुणांसाठीची परीक्षा दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत होणार आहे.

हेही वाचा – मोहोळ यांच्या कार्यालयात दूरध्वनी करताच १२० विद्यार्थ्यांच्या हवाई प्रवासातील विघ्न दूर! जाणून घ्या नेमकं काय घडलं…

हेही वाचा – भविष्यातील वाहने : ई-स्कूट, सेल्फ बॅलन्सिंग स्कूटर ते पॉड टॅक्सी!

s

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परीक्षेसाठी १ ते १५ डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह, १६ ते २३ डिसेंबर या कालावधीत अतिविलंब शुल्कासह, अतिविशेष विलंब शुल्कासह २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. ३१ डिसेंबरनंतर परीक्षा अर्ज भरता येणार नाही. या परीक्षेसाठी ५० रुपये प्रवेशशुल्क आणि १५० रुपये परीक्षा शुल्क आहे.