पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सरसंघचालक मोहन भागवत यांनी अंत्यदर्शन घेतले.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी मोतीबाग येथे देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सामान्य स्वयंसेवकापासून ते मान्यवरांची अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली आहे.

हेही वाचा – राज्यात पावसाचा आजपासून पुन्हा जोर

हेही वाचा – पश्चिम महाराष्ट्रात १४४ गावांना दरडींचा धोका; सर्वाधिक संख्या कोल्हापूर जिल्ह्यात

रस्ता वाहतुकीसाठी बंद

फुटक्या बुरुजपासून वीर मारूती मंदिराकडे जाणार रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.