राज्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्त्वात असतानाच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनाच रविवारी एका स्वयंघोषित बाबांनी हातचलाखी दाखवत सोनसाखळी भेट दिल्याची घटना समोर आली आहे. स्वयंघोषित बाबांच्या कार्यक्रमात जाणे आणि त्यांनी जादूने देऊ केलेली वस्तू स्वीकारणे यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीवर टीका होऊ लागली आहे.
सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित सूर्यदत्त पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आचार्य गुरूवानंद स्वामी प्रमुख मार्गदर्शक होते. यावेळी उपस्थित भक्तगणांकडून बाबाजी की जय हो चे नारे दिले गेले. पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आलेल्या सर्वच गौरवमूर्ती त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. या सर्वांनाच बाबाजींनी आशीर्वाद दिला. यावेळी उपस्थितांनी अमृता फडणवीस यांना भजन गाण्याचा आग्रह केला. भजन गायल्यानंतर परत जाताना अमृता फडणवीस यांनीही बाबांना नमस्कार केला. त्यावर बाबांनी हवेत हात फिरवून एक सोनसाखळी काढली आणि अमृता फडणवीस यांना दिली. त्यामुळं खूष झालेल्या उपस्थितांनी पुन्हा बाबाजींचा ‘जय हो’ केला.
या प्रकरणानंतर अमृता फडणवीस माध्यमांना माहिती देताना म्हणाल्या की, ‘ते माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत म्हणून त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला. त्यांनी आशीर्वाद घेण्यासाठी बोलावल्यानंतरच मी मंचावर गेले.’
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2016 रोजी प्रकाशित
बाबांनी हवेत हात फिरवून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला भेट दिली सोनसाखळी, अमृता फडणवीस अडचणीत
बाबांनी हवेत हात फिरवून एक सोनसाखळी काढली आणि अमृता फडणवीस यांना दिली.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 08-02-2016 at 17:11 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm wife amruta fadnavis in trouble