पुणे : राज्यात थंडीने मुक्काम ठोकला असून गेल्या १५ दिवसांपासून राज्यात जळगाव शहर आणि जिल्ह्याचे किमान तापमान निचांकी असल्याचे दिसून आले आहे. दिवसभरात नाशिक शहरात किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर जळगाव शहरात किमान तापमानाची १०.३ अंश सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस राज्याच्या सर्वच भागात थंडीचा कडाका कायम राहणार आहे.

हेही वाचा >>> पुणे : मार्केट यार्डातील कुरिअर कंपनीवर दरोडा घालणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून तापमानाचा पारा उतरला आहे. किमान तापमानात कमी-जास्त फरकाने चढ-उतार झाले असले, तरी चालू महिन्यात पहिल्या पंधरवड्यात दिवसा कोकणासह मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या सर्वच भागातील शहर आणि जिल्ह्याच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसने खालावले आहे. यंदा हिवाळ्यातील वैशिष्ट्य म्हणजे जानेवारी महिन्याच्या २ ते ३ जानेवारीपासून उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव शहराचे किमान तापमान ७ ते ९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहीले आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा तीने ते चार अंशानी उणे राहीले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महत्त्वाच्या शहरांमधील किमान तापमान

नाशिक ९.६, पुणे १०.२, जळगाव १०.३, औ.बाद ११.०, सातारा ११.९, गोंदिया १३.२, डहाणू १४.१, नागपूर १४.३, वाशिम १४.६, बुलढाणा १४.८, वर्धा १५.१ परभणी १५.२, सांगली १५.३, अमरावती १५.३, यवतमाळ १५.५, उ.बाद १६.०, ब्रम्हपुरी १६.०, सोलापूर १६.२, रत्नागिरी १६.६, नांदेड १६.८, कोल्हापूर १६.९, अकोला १७.१, चंद्रपूर १७.६ आणि मुंबई १८.०,