scorecardresearch

पुणे : दुचाकी चोरट्याला सहा महिने सक्तमजुरी

शुभम ज्ञानेश्वर जांभुळकर (वय २४, रा. येरवडा) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे.

labor punishment thief pune
दुचाकी चाेरट्याला सहा महिने सक्तमजुरी (प्रातिनिधिक छायाचित्र)

शहर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या एकाला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांनी सहा महिने सक्तमजुरी, तसेच ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास चाेरट्याला आणखी सात दिवस शिक्षा भोगण्याची तरतूद निकालात करण्यात आली आहे.

शुभम ज्ञानेश्वर जांभुळकर (वय २४, रा. येरवडा) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. जांभुळकरने येरवडा परिसरातून दुचाकी चोरली होती. पोलिसांनी त्याला दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय आणि पथकाने केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार राहुल शिंदे यांनी सहाय केले.

हेही वाचा – पुणे : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विद्यापीठाची सकारात्मक भूमिका, नवा रस्ता तयार केला जाणार

हेही वाचा – एक आठवी पास, तर दुसरा १२ वी पास कोट्याधीश, कसब्यातील भाजपा-काँग्रेस उमेदवारांची संपत्ती किती? वाचा…

सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील ॲड. योगेश कदम यांनी बाजू मांडली. साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने जांभुळकरला सहा महिने सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 12:34 IST